संत श्री सखाराम महाराजांच्या धर्मपत्नी सौ.सरस्वतीबाई यांच्या समाधीमंदिराचा कलशारोहण व पादुकास्थापना सोहळा!
रिसोड (Padukasthana) : दि. १२ ऑक्टोबर २०२५, रविवार या दिवशी अत्यंत मंगलमय वातावरणात, भक्तिभावाने व आनंदोत्साहात संपन्न झाला. कलश पुजन , व चरणपादुका स्थापना संस्थानचे वंशस्थ डॉ सखा महाराज यांच्या हस्ते संपन झाली , तर कलश स्थापना श्री सुरेश महाराज ब्रम्हचारी उटीकर व १००८ महामंडलेश्वर श्री कृष्णचैतन्य महाराज निळकंठेश्वर संस्थान पिंपरखेडा यांच्या हस्ते झाली. काल्याचे किर्तन श्री कृष्णचैतन्य महाराज (Shri Krishna Chaitanya Maharaj) यांनी केले.
सर्व श्रीभक्तांच्या सहकार्याने व उपस्थितीत हा धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न!
याप्रसंगी माजी मंत्री व परतूर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर, ज्ञानमंदिर मेहेकर चे डॉ. श्रीहरी महाराज पितळे, श्री सखाराम महाराज चे वंशस्थ गोविंद महाराज, कल्याण महाराज हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा व मंदिर बांधकामात सहकार्य करणाऱ्या सर्व शिल्पकार, दानदाते ग्रामस्थ , कार्यक्रमाला सहकार्य करणारे ग्रामस्थ,भजन मंडळी यांचा श्री सखाराम संस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला. सर्व श्रीभक्तांच्या सहकार्याने व उपस्थितीत हा धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. भक्तगणांनी (Devotees) मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा लाभ घेतला.