बलूचिस्तान (Pakistan Train Attack) : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज सुमारे 400 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ट्रेन चालक जखमी झाला आणि मोठ्या संख्येने प्रवासी घाबरले. माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मी (BLA) नावाच्या फुटीरतावादी संघटनेने या (Pakistan Train Attack) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवाद्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी ट्रेन पूर्णपणे ताब्यात घेतली आहे आणि 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले. एवढेच नाही तर या हल्ल्यात 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे दहशतवाद्यांचे म्हणणे आहे. या (Pakistan Train Attack) घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, प्रशासनावरील हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही (Pakistan Train Attack) ट्रेन बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही एक फुटीरतावादी संघटना आहे जी बलुचिस्तानसाठी अधिक स्वायत्ततेची मागणी करते. संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, (Pakistan Train Attack) अपहरण केलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी दल (ATF) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) चे अधिकारी होते जे पंजाबला प्रवास करत होते.
महिला, मुले आणि बलुच प्रवासी सुरक्षित?
बीएलएच्या निवेदनानुसार, त्यांनी महिला, मुले आणि बलुच प्रवासी मागे सोडले आहेत. आता, ज्यांना ओलिस ठेवले आहे ते फक्त पाकिस्तानी सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत. (Pakistan Train Attack) बलुचिस्तान प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप हल्ल्याबद्दल आणि ओलिसांच्या स्थितीबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.