रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात समारंभ आयोजित!
रिसोड (Palkhi Ceremony) : श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळा (Palkhi ceremony of Shri Sant Gajanan Maharaj) आगम्णानिमीत्य रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरांतील श्री हनुमान मंदीर व श्री महादेव मंदीर जिणोध्दार तथा शेतकऱ्यांसाठी (Farmers) शिदोरी गृह बांधकामाचे (Home Construction) भुमिपुजन येवता येथील श्री सिध्देश्वर संस्थानचे महंत श्री शांतीपुरीजी महाराज व भर जहाँ. येथील पंचायती महानिर्वाणी आखाडा चे महंत रतनगड येथील महंत गोपालगिर महाराजांच्या हस्ते बुधवारी दि. 11 जून 2025 सकाळी 10:30 वाजता रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) आवारात समारंभ आयोजित केला आहे. तरी परिसरातील शेतकरी, व्यापारी यांनी याप्रसंगी प्रमुख उपस्थित राहण्याचे आवाहन वाशीम कृ. ऊ. बा. स. चे सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी केले आहे.
शामराव निंबाजी उगले माजी सभापती तथा संचालक कृ.उ.बा.स. रिसोड रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सभापती शामराव ईंगोले, माजी सभापती व संचालक गजाननराव पाचरणे, उपसभापती तथा संचालक राजाराम आरु, व्यापारी संचालक पुरुषोत्तम तोष्णीवाल संचालक शाम महाराज खराटे संचालक मा. धंनजय बोरकर, संचालक राजेंद्र उर्फ भैय्यासाहेब देशमुख, संचालक सौ. चंद्रभागाबाई भाऊराव गरड संचालिका मा. श्री. रविंद्र चोपडे, संचालक ॲड. गजाननराव अवताडे संचालक संतोष सानप, संचालक भगवान गाडे संचालक रमेश गायकवाड संचालक भीमराव शेजुळ संचालक रामचंद्र बुधनेर यांच्यासह सर्व कर्मचारी तथा व्यापारी, आडते, हमाल, मापारी शेतकरी व गजानन महाराज भक्तांनी केले आहे.