पालोरा (Palora Gram Panchayat) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत २५ लक्ष रुपये खर्च करून नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण सोहळा आयोजित केला तसेच ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत १० लक्ष रुपयाचे सभामंडप मंजूर झाले होते ते काम पूर्ण झाले असल्याने त्याही इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी (Palora Gram Panchayat) कार्यक्रमाचे नियोजित पाहून मंडळी आले नाही, त्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सभापती जगदीशजी शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी मंचावर उपसभापती देवाभाऊ चकोले, जि.प.सदस्य महादेव पचघरे, पंस सदस्या प्रिती कैलास शेंडे, सरपंचा वनिता राऊत, रमेश पाटील गोबाडे, लिलाधर कांबळे सरपंच निलज (बु), राजधर शेंडे, सुंदरा मुंगुसमारे, राधेश्याम उईके, विनायक परतेकी, संतोष भालाधरे, सुनिता मुंगूसमारे, सुनिता नाकाडे, माधुरी ठाकरे, अर्चना गोबाडे इतर मंडळी उपस्थित होते. यावेळी सभापती जगदीश शेंडे यांनी अध्यक्षीय भाषणात सभापती यांची जीभ घसरली आणि सांगितले जनतेला फुकट खाण्याची सवय झाली आहे. त्यामुळे शासनावर बोझा निर्माण झाला आहे. पुढे बोलतांनी सांगितले की, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक विकासाची कामे करता येतात. विकासकामे करायची असतील तर माझ्यापर्यंत या सर्व कामे मंजूर करून दिले जातील असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुपेंद्र पवनकर केले. प्रास्ताविक उपसरपंच यादोराव मुंगमोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल धमगाये ग्रामविकास अधिकारी यांनी मानले.
सभापती जगदीश शेंडे यांनी जो जनतेविषयी संभाषण केले आहे. ते अत्यंत निंदनीय आहे. कोणीही शासनाकडे फुकटाची मागणी करत नाहीत, शासनाने आपल्या स्वार्थासाठी योजना तयार केली आहेत.
-गोंविदा युवराज गोबाडे, शेतकरी जांभोरा