आगामी नेतृत्व तयार होण्याच्या दृष्टीने जोरदार राजकीय हालचालींची शक्यता!
लातूर (Panchayat Committee) : लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. लातूर उदगीर व चाकूर या तीन तालुक्यांचे सभापतीपद ओबीसी प्रवर्गासाठी (OBC Category) आरक्षित झाले आहे. तर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी अहमदपूर देवणी व शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यांचे सभापतीपद आरक्षित झाले आहे. यामुळे या तीन तालुक्यात आगामी नेतृत्व तयार होण्याच्या दृष्टीने जोरदार राजकीय हालचालींची शक्यता आहे.
महिलेसाठी व पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित!
सोमवारी लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांकरिता आगामी काळात सभापती पदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात त्यामध्ये निलंगा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्गातील (Scheduled Caste Category) महिलेसाठी तर औसा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले.
दहा ही पंचायत समितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १) निलंगा – महिला २) औसा – पुरुष. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी १) उदगीर – महिला २) चाकूर – महिला ३) लातूर – पुरुष. सर्वसाधारण प्रवर्गासाठी – १) रेणापूर – महिला २) जळकोट – महिला ३) अहमदपूर – पुरुष ४) देवणी – पुरुष ५) शिरूर अनंतपाळ – पुरुष.