हिंगोली (Zilla Parishad) : नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामुळे हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला दोन वर्षांनंतर कायमस्वरूपी अधिकारी मिळाला आहे.
दरम्यान, येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पंचायत विभाग हा मागील दोन ते तीन वर्षा पासून प्रभारी वर आहे. कायमस्वरूपी अधिकारी मिळत नसल्याने प्रभारी वरच काम करावे लागते. यापूर्वी विशाल राठोड यांची नियुक्ती केली मात्र चार महिने झाले की नाही तीच त्यांची बदली झाली त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड येथून आलेले उपमुख्यकार्यकारी अधिकारी ठोंबरे यांनी ही दोन चार महिने पद सांभाळल्या नंतर त्यांनाही पदोन्नती मिळाली. अखेर येथील पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील उपमुख्यकार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला. बोन्द्रे यांचीही बदली झाल्यानंतर मागील तीन ते साडे तीन महिन्या पासून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या कडे पदभार सोपवीण्यात आला. मात्र त्यांच्या पूर्वी काही महिने अनंत कुमार कुंभार यांनी अतिरिक्त पदभार पहिला.
दरम्यान, आता विधानसभा निवडणुका पूर्वी ऑर्डर पडली असेल परंतू विधानसभा निवडणुका पार पडल्या आता यवतमाळ येथील गटविकास अधिकारी के. एल. गड्डापोड यांची हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पंचायत विभागाच्या रिक्त पदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली आहे. मात्र ते कधी रुजू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पंचायत विभागाला आता कायम स्वरूपी अधिकारी मिळाल्याने कामे मार्गी लागतील अशी कर्मचारयातून चर्चा सुरु आहे.