अपघातात दोघे गंभीर जखमी
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटातील घटना
परभणी/रामेटाकळी (Parbhani Accident) : देवदर्शन करुन जेजुरी येथून गावाकडे निघालेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात अपघात झाला. ही घटना शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत मानवत तालुक्यातील वझुर बु. येथील डॉक्टर बहिण, भावाचा मृत्यू झाला. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या (Parbhani Accident) अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, डॉ. ओंकार ज्ञानोबा चव्हाण, डॉ. मृणाली भास्कर शिंदे (चव्हाण) हे दोन बहिण, भाऊ मयत झाले. तर डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. मंथन चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. मंथन चव्हाण यांचे लग्न झाल्याने नवविवाहिता डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. ओंकार चव्हाण, डॉ. मृणाल शिंदे ( चव्हाण) हे सर्वजण देवदर्शनासाठी गेले होते.
जेजुरी येथून एम.एच. २२ – ए.एम. ४५७१ या चारचाकी वाहनाने परत येत असताना बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा जवळ मुळूकवाडी येथील पुलावर त्यांची गाडी आदळली. या अपघातात डॉ. ओंकार चव्हाण, डॉ. मृणाली शिंदे (चव्हाण) यांचा मृत्यू झाला. तर डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. मंथन चव्हाण हे गंभीर जखमी झाले. अपघातात गाडीचे टायर निखळून पडले. (Parbhani Accident) जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.