परभणी-गंगाखेड महामार्गावरील घटना, दोन तास रस्ता बंद!
परभणी/दैठणा (Parbhani Accident) : उसाच्या धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक निखळून आपघात झाला. ही घटना परभणी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर इंद्रायणी नदी पुलाजवळ मंगळवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. (Parbhani Accident) ट्रॅक्टर आपघातग्रस्त झाल्याने हा रस्ता दोन तास बंद होता.
झिरो फाटा येथून ऊस घेऊन एम.एच.४४ झेड ०१६८ हा ट्रॅक्टर गंगाखेडकडे निघाला होता. भरधाव वेगात जात असलेल्या ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीचे टायर निखळले. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले. ट्रॅक्टरमध्ये मोठया आवाजात गाणे सुरू असल्याने आपघात झाल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर सगळीकडे ऊस पसरला. (Parbhani Accident) अपघातामुळे सदर मार्गावरील वाहतुक दोन ते तीन तास विस्कळीत झाली होती. ऊस रस्त्यावर पडल्याने शेतकर्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.