असोला परिसरातील घटना; मयत व जखमी पेडगाव येथील रहिवाशी!
परभणी (Parbhani Accident) : परभणीतील असोला परभणी वसमत रस्त्यावरील असोला पाटी परिसरात आयशर-दुचाकीचा अपघात होऊन एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आयशर चालकावर गुन्हा दाखल!
याप्रकरणी वाहनासह चालकावर ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत माहिती अशी की, आयशर क्र. एमएच – ४४ -७५५० व दुचाकी क्रं -एमएच – २२ एसी – ९२१५ यांच्यात परभणी वसमत रोडवरील असोला पाटी परीसरात अपघात होऊन दुचाकीवील आरबाज मैनु शेख (वय २५) रा. पेडगाव ता. जि. परभणी हा जागेवरच ठार झाला तर त्याचा मित्र अविनाश तरफडे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी मैनु इब्राहिम शेख रा. पेडगाव ता. परभणी यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात (Tadkalas Police Station) आयशर चालकावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे, बालाजी रणेर, आप्पाराव वर्हाडे, भगवान चोरघडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरबाज शेख व त्याचा मित्र अविनाश तरफडे हे दोघे जण दुचाकीवरुन नांदेड येथे आरबाज याच्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले होते. परत पेडगावकडे येत असताना असोला पाटी येथे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.