भाजी मार्केट समोरील घटना!
परभणी (Parbhani Accident) : शहरातील पाथरी रोडवर भाजी मार्केट समोर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात (Truck-Bike Accident) एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 17 जून रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. अपघातानंतर, नानलपेठ पोलीसांनी (Nanalpet Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) आणला आहे.
मयत ठाकरे नगरातील रहिवाशी!
या अपघाताविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनंता अच्युतराव कुलकर्णी वय 62 वर्ष रा.ठाकरे नगर असे मयताचे नाव आहे. अनंता कुलकर्णी हे पाथरी रोडवरील वेदांतवाडी येथुन एमएच 22 ए एस 7573 या दुचाकीवरुन ठाकरे नगराकडे येत होते. तर एम एच 12 एच डी 9333 या क्रमांकाचा मालवाहु ट्रक परभणीकडे येत होता. या दोन्ही वाहनाचा पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर अपघात झाला. अपघातात अनंता कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातची माहिती मिळताच नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोनी. गणेश कदम, पोउपनी. देशमुख, पोलीस अंमलदार बी.ए. बीक्कड, एस.एस.पवार, चव्हाण, राजु सुशे, कृष्णा मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्याची प्रक्रिया सुरु होती.