परभणी शहरातील मॉडल उर्दू हायस्कूल मधील प्रकार
परभणी (Parbhani Bribery case) : शहरातील मॉडेल उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद यांनी पर्यवेक्षक असलेल्या कर्मचार्यास सहा महिन्याच्या थकीत वेतनातून १८००० रुपये लाचेची मागणी केली. मागणी सिद्ध झाल्यानंतर मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी व लिपिक बुढन खान महबूब खान पठाण यांना (Parbhani Bribery case) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
परभणी शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूल मध्ये पर्यवेक्षिका यास एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या दरम्यानचे थकीत वेतन मिळाले होते. प्रत्येक महिन्याच्या वेतनातील तीन हजार रुपये प्रमाणे पैसे देण्याची मागणी मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांनी केली. १७ मार्च रोजी मागणी केल्यानंतर १८ मार्च रोजी (Parbhani Bribery case) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर लाचेची पडताळणी केली असता मुख्याध्यापिका यांनी लाच स्वीकारण्यास होकार दिला.
१९ मार्च रोजी लाचेची रक्कम ही लिपिक बुढन खान यांच्याकडे मुख्याध्यापिका सिद्धीकी अहमदी यांनी देण्यास सांगितले त्यानुसार लाच दिली असता लाच स्वीकारण्यात आली. (Parbhani Bribery case) लाचेची रक्कम स्वीकारल्या बरोबर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर घराची झडती घेतली असता मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांच्या घरी ९ लाख ५० हजाराची रोख मिळाली आहे तर बुढन खान यांच्या घराची झडती घेणे चालू होती.
सदरील (Parbhani Bribery case) कारवाई पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी, बसवेश्वर जकीकोरे व कर्मचारी निलपत्रेवार, सीमा चाटे, अतुल कदम, कल्याण नागरगोजे, शाम बोधनकर, राम घुले, नामदेव आदमे, जे. जे. कदम, नरवाडे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी हे करत आहेत. ही घटना म्हणजे शिक्षण पद्धतीला काळीमा फासणारी आहे.