अज्ञात चोरट्यावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल 
भरदिवसा घडली घटना
परभणी (Parbhani Burglary) : शेतात कामानिमित्त गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवार ९ एप्रिल रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी ३ या दरम्यान लोकमान्य नगरात घडली. (Parbhani Burglary) भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र विनायकराव राऊत यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे कुटूंबासह स्वत:च्या शेतात कामानिमित्त गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडत घरात प्रवेश केला. (Parbhani Burglary) कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख ६० हजार रुपये, घड्याळ व इतर साहित्य मिळून २ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. श्वानपथक, ठसे पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, सपोनि. बी.आर. बंदखडके यांनी भेट दिली. (Parbhani Burglary) चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.




 
			 
		

