परभणी (Parbhani Bus) : सोनपेठ तालुक्यांची निर्मिती होऊन तब्बल २१ वर्षाचा कालावधी लोटला आहे तरी अद्यापही या ठिकाणी आगार स्थापन झाले नाही.त्यामुळे प्रवाशांना आयुर्मान संपलेल्या बसमधुन (Parbhani Bus) आपला जिव मुठीत धरून जिवघेणी प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सोनपेठ हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शासकीय कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, शाळा,महाविद्यालय, रुग्णालये यांसह मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी व्यापारी व अन्य प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या मोठी प्रमाणावर असते. परंतू राज्य परिवहन महामंडळाच्या (Parbhani Bus) बसेसची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. खिडक्या तुटलेल्या, पावसाळ्यात बस गळकी, चालकांना काचावर वायफर नाही, आसान व्यवस्था तुटलेल्या, यांसह अन्य समस्यांचा सामना करीत प्रवाशांना आपला जिव मुठीत धरून जिवघेणी प्रवास करावा लागत आहे.
त्यात विशेष म्हणजे या (Parbhani Bus) बसेस आयुर्मान संपलेल्या असताना देखील सर्रासपणे आगार प्रमुखांच्या ढिसाळ कारभारामुळे बसेस रस्त्यावर धावत आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची आयुर्मान संपलेल्या असताना देखील चालक जोखीम घेऊन बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक सुरू आहे.दुर्दैवाने ह्या बसेस अर्ध्या रस्त्यात नादुरुस्त झाल्यास कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोनपेठ बस स्थानकांवर गंगाखेड आगार प्रमुखांचे नियंत्रण आहे.
तालुक्याचे ठिकाणी असताना देखील नांदेड,लातुर आळंदी,औसा ह्या लांब पल्ल्याच्या बसेस सोडल्या तर दुसरी एकही लांब पल्ल्याच्या बसेस नाहीत.त्यामुळे सोनपेठ करांना टप्पे पार करत प्रवास करावा लागत आहे. सोनपेठ तालुक्याची निर्मिती झाली तेव्हापासून ते आजपर्यंत आगार स्थापन करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.मात्र अद्याप आगार स्थापन झाले नाही. लोकप्रतिनिधी व राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्यातील विविध आगार साठी (Parbhani Bus) नविन बसेस देण्यात येत आहेत.मात्र सोनपेठ तालुक्याकडे कानाडोळा होताना दिसत आहे.याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे…!