परभणी(Parbhani) :- पाथरी बाजार समितीच्या (Market Committee) आर्थिक व्यवहाराचे अधिकार घेत सत्ताकारणात जाणाचा शिवसेना (Shivsena)गटाचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे. उपसभापती शाम धर्मे यांनी बाजार समितीत २४ जानेवारी रोजी घेतलेले ठराव असंवैधानिक असल्याचे म्हणत घेतलेल्या आक्षेपावर निर्णय देतांना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी याबैठकीतील प्रस्ताक क्रं १ व २ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
संचालक घांडगे यांचे आर्थिक व्यवहारचा अधिकार काढले
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील महिण्यात २४ जानेवारी रोजी झालेल्या सभेत पारित केलेले सर्व ठराव असंवैधानिक असून ते सर्व ठराव रद्द करण्यासाठी आ . बाबाजानी दुर्राणी गटाचे उपसभापती शाम धर्मे यांनी ३१ जानेवारी रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आक्षेप दाखल केला होता. त्यावर विभागीय सहनिबंधक,यांनी या सभेतील प्रस्ताव क्रं १ नुसार संचालक एकनाथ उर्फ पप्पू घाडगे यांना बँकेचे खाते चालवण्यासाठी सह्यांचे नमुने पाठविण्याचा पारीत ठराव व प्रस्ताव क्र . २ नुसार सचिव बी.जी. लिपने यांचा पदभार काढून सहाय्यक सचिव बी.एस . टेंगसे यांना दिलेला प्रभारी सचिव पदाचा पदभार रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. आदेशात खर्च्या बाबत आदेश नसल्याचे म्हटले आहे .
