पालम तालुक्यातील घटना, अकस्मात मृत्युची नोंद
परभणी (Parbhani committed suicide) : पालम तालुक्यातील शेतातील लिंबाच्या झाडाला ३६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान पालम तालुक्यातील आडगाव शिवारात घडली. या (Parbhani committed suicide) प्रकरणी पालम पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुष्पाबाई कचरुबा गुंडाळे यांनी खबर दिली आहे. माधव कचरुबा गुंडाळे, असे मयताचे नाव आहे. माधव याने मद्यपी अवस्थेत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. प्रकरणाचा तपास पोह. ज्ञानेश्वर कांगणे करत आहेत.
रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
मानवत : तालुक्यातील देऊळगाव आवचार रेल्वे पटरीवर कोणत्यातरी रेल्वेतून पडल्याने एका पुरुषाचा मृत्यू झाला. २ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास सदर इसमाचा मृतदेह आढळून आला. या (Parbhani committed suicide) प्रकरणी पोलीस पाटील माणिक जाधव यांच्या खबरीवरुन मानवत पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. पाटील करत आहेत.