वनामकृवितील बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रातील प्रकार
परभणी (Parbhani Cooker Explosion) : बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रात प्रयोगशाळेत काम करत असताना अचानक अॅटोक्लेव कुकरचा स्फोट झाला. या घटनेत कंत्राटी दोन महिला कामगार जखमी झाल्या आहेत. ही (Parbhani Cooker Explosion) घटना मंगळवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा ते एकच्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्कीटमुळे कुकरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठ वनस्पती रोग शास्त्र विभागात बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्र प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी विविध यंत्र ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी नेहमी प्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक अॅटोक्लेव (Parbhani Cooker Explosion) कुकरचा स्फोट झाला. या घटनेत प्रयोग शाळेतील दोन महिला कामगार जखमी झाल्या. त्यांना तातडीने परभणीतील वसमत रोडवर असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या या महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या (Parbhani Cooker Explosion) घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे घटना घडल्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी घटना कशी घडली, या विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही घटनेनंतर प्रयोग शाळेतील अधिकारी देखील रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचार्यांनी घटनेबाबत बोलण्याचे टाळले.