नांदेड विद्यापीठाचा भोंगळ कारभार, विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण
परभणी (Parbhani Exam) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाच्या पदव्युत्तर वर्गाच्या हिवाळी परीक्षा २०२४ उद्या मंगळवार १० डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. परंतु सोमवार ९ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत बर्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना (Hall Ticket) हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत वृत्त असे की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाच्या परीक्षा विद्यापीठाने मंगळवार १० डिसेंबर पासून होणार असल्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे. परंतु ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी शहरातील अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले नाहीत.परीक्षाथी संबंधित महाविद्यालयात सोमवारी दिवसभर (Hall Ticket) हॉल तिकीटची वाट पाहत थांबलेले दिसून आले.
काही महाविद्यालयात विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि कर्मचारी यांच्यात शाब्दीक वाद झाले. उद्या मंगळवारी (Parbhani Exam) परीक्षा असताना अद्यापही आमचे हॉल तिकीट मिळाले नाही, आम्ही परीक्षा कशी द्यायची अशा प्रकारची विचारणा करीत आहेत. विद्यापीठाकडून (Hall Ticket) हॉल तिकीट न मिळाल्यामुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी सर्वच गोंधळात पडले आहेत. परीक्षा होणार की नाही आणि झाली तर पेपर देता येईल का नाही, याबाबतीत विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे..!
बहिस्थ परीक्षा विभागाचे काम एमकेसीएल ला दिलेले आहे. तांत्रिक कारणामुळे (Hall Ticket) प्रवेशपत्र देण्यात विलंब होत आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. हॉल तिकिट सर्वांना मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही, त्यांनी संंबंधित परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेवर रहावे, त्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे. कुणीही परीक्षेपासून वंचित राहणार नाही.
– होशियारसिंह साबळे, संचालक परीक्षा व मुल्यमापन केंद्र, स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड