परभणी (Parbhani fire) :- शहरातील रहेमत नगर खोजा जमातखाना परिसरात असलेल्या चप्पल, बुटाच्या गोदामाला भिषण आग लागली. ही घटना मंगळवार १३ मे रोजीच्या मध्यरात्री घडली. आगीत (Fire) गोदाम जळून खाक झाले असून जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीमध्ये जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान
तब्बल साडे तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग अटोक्यात आणली. चप्पल, बुटाच्या गोदामाला आग लागल्याची माहिती अब्दुल अलीम यांनी अग्निशमन दलाला दिली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत चप्पल, बुट, कॅरेट जळून खाक झाले. दोन अग्निशमन वाहनांच्या (Fire fighting vehicles) सहाय्याने चार बंब पाणी वापरुन साडे तीन तासाच्या परिश्रमानंतर आग अटोक्यात आणण्यात आली. नेमकी ही आग कशी लागली, हे मात्र समजु शकले नाही. महापालिकेचे अग्निशमन अधिकारी डि.यु. राठोड, जवान उमेश कदम, निखिल बेंडसुरे, मदन जाधव, वसीम अखिल अहेमद, अक्षय पांढरे, समी सिद्दिकी यांच्या पथकाने आग विझविली.