पंजाब डख यांची माहिती
परभणी (Parbhani Heavy Rain) : राज्यात २१ सप्टेंबर नंतर मुसळधार पाऊस पडणार (Heavy Rain) असून त्यामुळे शेतकर्यांनी २० सप्टेंबर पर्यंत शेतीची कामे उरकून घ्यावीत. अशी माहिती पंजाब डख (Punjab Dakh) यांनी दिली आहे. त्या दृष्टीकोणातून शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील काढण्यास आलेले सोयाबीन, उडीद, मुग पिके या ७ दिवसात काढून घ्यावीत, तसेच ज्या शेतकर्यांना कांदा पिकाचे रोप टाकायचे आहे त्यांनी ते टाकून घ्यावे.
२० सप्टेंबर पर्यंत शेतकर्यांनी कामे उरकून घ्यावीत
सध्या आठवडाभर राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून २१ ते २ ऑक्टोंबर दरम्यान मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार असून त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील मांजरा, बीड जिल्ह्यातील माजलगाव, परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरणार आहे. हा पाऊस महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धारासुर, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पूणे, बीड या भागात असण्याची शक्यता आहे. तो पाऊस उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे.
मागील पावसात तेलंगणा, कर्नाटक मधील शेतकर्यांचे कांद्याचे नुकसान झाले असून, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे साठवणूक केलेला कांदा असल्याने त्याचा फायदा होणार आहे. सध्या पाऊस दुसर्या राज्यात गेला असल्याने (Heavy Rain) महाराष्ट्रात सात दिवस विश्रांती असणार आहे. जर वातावरणात अचानक काही बदल झाला तर त्यानूसार अंदाज देण्यात येणार असल्याची माहिती हवामानतज्ञ पंजाब डख (Punjab Dakh) यांनी दिली आहे.