परभणी/सोनपेठ (Parbhani Heavy rains) : तालुक्यात रविवारी रात्रीपासून व सोमवारी दिवसभर झालेल्या (Heavy rains) अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पुर आल्यामुळे नदी काठच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत. अतिवृष्टीने जिरायती, कापुस व सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, तब्बल १६ हजार ८१ हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सोनपेठ तालुक्यात शेळगाव, वडगाव, आवलगाव व सोनपेठ या चार महसूल मंडळात १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या (Heavy rains) अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कापुस व सोयाबीन या (crop damage) पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोदावरी नदी व वान नदीला पूर आल्याने आजुबाजुच्या शेतात पूराचे पाणी घुसल्याने कापुस, सोयाबीन, तूर, बाजरी, हायब्रीड ज्वारी, मका, उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तालुक्यातील शेळगाव, वाणीसंगम या भागातील बाधीत प्रत्यक्ष क्षेत्रांची पाहाणी केली आहे.
तालुका प्रशासनाने सोनपेठ तालुक्यात एकुण १६ हजार ८१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सुनील कावरखे यांनी महसूल, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना देण्यात आले आहे. यामध्ये सोनपेठ तालुक्यात (Heavy rains) अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पडझडीत घरांचे नुकसान झाले आहे किंवा जिवित हाणी आहे का? यासंदर्भात पाहाणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सोनपेठ तालुक्यात चार महसूल मंडळात शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
नुकसान भरपाईची मागणी
तालुक्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rains) झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी चारही महसूल मंडळातील शेतकर्यांनी केली आहे.