परभणी/चारठाणा(Parbhani):- पोलिसांना आपले विविध विभाग चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थापनेपासून पोलिसांचे काम येथील हुतात्मा स्मारक जागेत छोट्या इमारतीमधून सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी नवीन जागेत पोलिस इमारतीसाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करत कार्पोरेट लूक असलेली नूतन इमारतीचे बांधकाम (Construction) पूर्ण झाले आहे.
इमारतीचे काम पूर्ण…
मात्र या इमारतीच्या उद्घाटनाला विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इमारतींच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिंतूर पोलिस ठाण्याच्या (Police station) हद्दीचा मोठा परिसर तसेच वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नवीन पोलिस ठाणे हे चारठणा व परिसरातील ४९ छोट्या गावांसाठी तालुक्यातील मोठे गाव असल्याने चारठाणा येथे तयार करण्यात आले आहे. २०१४ साली नव्याने चारठाणा पोलिस ठाणे तयार करण्यात आले आहे. स्थापनेनंतर या ठिकाणच्या पोलिस यंत्रणेला बळ मिळाले आहे. आता नवीन पोलिस ठाण्याच्या इमारत नागरिकांना तिच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. चारठाणा पोलिस ठाणे तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच याच्या कॉर्पोरेट लूक मुळे ते उद्घाटनापूर्वीच चर्चेत आले आहे.