परभणी/जिंतूर (Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील बामणी येथे 87 लाख रुपये असलेल्या अंदाजपत्रकातील जलजीवन मिशन अंतर्गत विहीर व पाईपलाईन संदर्भात मागील दोन वर्षा पासून गावकऱ्यांनी अनेक निवेदने व प्रसिद्धी माध्यमांद्वारे आवाज उठवून देखील चौकशी गुलदस्त्यात अडकून बसल्याने नेमके पाणी कुठं मुरतंय याचा शोध लावण्यासाठी शासन दरबारी अनेक खेटे मारून सुद्धा चौकशी होत नसल्याने पुन्हा नागरिकांनी दिनांक 4 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
जिंतूर तालुक्यातील बामणी येथील प्रकार दोन वर्षांपासून चौकशी प्रलंबित…!
जिंतूर तालुक्यातील बामणी येथे जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत 2023 पासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीत खोदण्यात आलेल्या विहिरीची चौकशी करावी आणि 87 लाख रुपये अंदाजपत्रक असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत आता 23 लाख रुपये बोगस बिल उचलून घेतल्याने बामणी गावात एकच खळबळ उडाली आहे. याच योजनेतील अर्धवट विहिरीची चौकशी तर सोडाच पुन्हा अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमत करून 23 लाख रुपयाचे बोगस बिले उचलल्याचे उघड झाले म्हणून बामणी येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्यासह पालकमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत स्मशानभूमी लगत गावठाण मध्ये शाखा अभियंता यांच्या हस्ते कोअरबोर घेण्यात आला होता.
ग्रामपंचायतच्या सरपंचाला हाताशी धरून 23 लाख रुपये निधी उचलल्याची बाब समोर आली
मात्र सदर ठिकाणच्या कोअरबोरच्या जागेवर विहीर न घेता हिंदूंच्या लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीत कंत्राटदाराने विहीर खोदली होती. ही विहीर खोदताना मानवी हाडांचे सांगाडे बाहेर निघाले यामुळे एकच खळबळ उडाल्याने खोदकाम करणारी जेसीबी बंद करून हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते. यानंतर या विहिरीवर आक्षेप आल्याने हे काम बंद झाले मात्र तब्बल दोन वर्षांनी अधिकारी व कंत्राटदाराने संगनमताने बोगस थातुर मातूर पाईपलाईन (Pipeline) करून ग्रामपंचायतच्या सरपंचाला हाताशी धरून 23 लाख रुपये निधी उचलल्याची बाब समोर आली बामणी येथील माजी सरपंच भगवानराव देशमुख, तुकाराम देशमुख, प्रकाश आप्पा थळकरी, सय्यद अजिज जहागीरदार यांच्यासह इतरांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्वारे निदर्शनास आणून दिली आहे. त्या स्मशानभूमीतील दफनविधी केलेल्या मानवी सांगडे विहीर खोडल्याने बाहेर निघालेत यामुळे समाजातील भावना दुखावल्याची कार्यवाही तर झालीच नाही.
मात्र पुन्हा त्याच योजनेचे काम पूर्ण न करता 23 लाख रुपये बिल उचलल्याने नागरिकांना एका प्रकारे आश्चर्यचा धक्का बसला आहे. सदर बाबीची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.