परभणी(Parbhani):- सेलू शहरातील एका परिसरात राहत असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस आजीच्या घरून पळविल्या प्रकरणी तरुणावर ४५ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून १४ जानेवारी रोजी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीस आजीच्या घरून पळविले
याप्रकरणी पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.सध्या त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती याप्रमाणे या घटनेतील ४५ वर्षीय फिर्यादीची१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी असल्याचे माहित असताना आरोपी याचे प्रेम प्रकरण झाले होते. त्यामुळे मुलीला शहरातुन आहेर बोरगाव येथे आजीच्या घरी सोडण्यात आले होते. घटनेच्या दिवशी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुलीची आजी घरी नसताना मुलगी कोणाला काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून विविध कमलानुसार सोनू खंडू सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच पोलीसांनी आरोपी सोनु सोनवणे यास ताब्यात घेऊन न्यायालयात (Court) हजर केल्यानंतर आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत. दरम्यान शहरात मुलींना त्रास देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुतेक प्रकरण हे मिटवामिटवी होत असल्यामुळे गुन्हा पोलीसात दाखल होत नाही.




