परभणी/गंगाखेड (Dr. Ratnakar Gutte ) : विधानसभा मतदार संघातील रासपाचे उमेदवार आ. डॉ रत्नाकर गुट्टे (Dr. Ratnakar Gutte) यांचा जाहीरनामा संकल्पनामा २०२४ नावाने रविवार १० नोव्हेंबर रोजी रामसिता सदन येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाशित करण्यात आला.
विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीत सध्या सर्वच पक्षांच्या वतीने आपआपले जाहीरनामे प्रकाशित करुन मतदार संघातील जनतेच्या हिताची कामे कोणती व मुलभुत प्रश्न गरजा अगदी गावातील सामान्य नागरीकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन जनतेपर्यंत पोहचण्याच्या योजनाद्वारे विकासाची गंगा मतदारसंघात आणण्यासाठीचे प्रयत्न करत असल्याचे दाखविले जात आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आ. डॉ रत्नाकर गुट्टे (Dr. Ratnakar Gutte) हे दुसऱ्यांदा नशिब आजमावत आहे. त्यांच्या वतीने रविवार १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा जाहीरनामा संकल्पनामा २०२४ नावाने रामसिता सदन येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळी डॉ. रत्नाकर गुट्टे (Dr. Ratnakar Gutte) काका मित्र मंडळाचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजी पोले, नारायण शेंडगे आदींसह मित्र मंडळ व रासपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा मतदार संघांतील केलेल्या विकास कामांची व भविष्यात करावयाच्या कामाची माहीती आ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना देउन आपल्या निवडणुकीचा संकल्पनामा प्रसिद्ध करीत गंगाखेड विधानसभा मतदार संघात भविष्यात करावयाच्या कामाची जबाबदारी आताच स्विकारतो कारण गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने येथील मतदार मला निवडुन देतील असा विश्वास व्यक्त केला.




