महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध गणेश देशमुख यांचे आंदोलन
परभणी (Parbhani Municipality) : घंटागाड्या बंद असल्याने शहरात कचर्याचे ढिग जमा झाले आहेत. (Parbhani Municipality) मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत प्रभाग क्रमांक एकचे माजी नगरसेवक गणेश सुरेशराव देशमुख यांनी अनोखे आंदोलन करत सोमवार २२ सप्टेंबर रोजी ट्रकभर कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून टाकला.
झोपलेल्या प्रशासनाला (Parbhani Municipality) जागे करण्याच्या उद्देशाने सदर आंदोलन करण्यात आले. परभणी शहरात कचर्याची समस्या गंभीर बनली आहे. कचर्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरत असून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा टाकला आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या कारभाराचा निषेध करत मनपा परिसरात कचरा आणून टाकण्याचा इशारा गणेश देशमुख यांनी दिला होता. सोमवार २२ सप्टेंबर रोजी त्यांनी परिसरातील नागरीकां बरोबर मिळून आंदोलन करत ट्रकभर कचरा मनपाच्या प्रवेशद्वारावर आणून टाकला. या नंतर आयुक्त नितीन नार्वेकर यांना मागणीचे निवेदन सादर केले.