एक नवीन आरोपी वाढला!
परभणी (Parbhani Murder) : शहरातील बाळासाहेब ठाकरे कमान येथे झालेल्या विशाल आर्वीकर खून प्रकरणात (Vishal Arvikar Murder Case) नानलपेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर (Court) हजर केले असता, त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. या घटनेत आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली आहे.
आरोपींच्या शोधात पथक रवाना!
परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कमानी जवळ विशाल आर्वीकर कदम यांचा खून शुक्रवार 9 मे रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटाच्या दरम्यान करण्यात आला. या प्रकरणात विक्की पाष्टे, गोविंद उर्फ गोपाळ पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांनी खून केल्याची तक्रार मयताची बहीण वर्षा गिराम यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) दिली. यानंतर नानलपेठ पोलिसांनी तात्काळ शुभम पाष्टे व गोविंद उदावंत या दोघांना ताब्यात घेतले. तक्रारीमध्ये चार आरोपी असताना, गोविंद उदावंत हा पाचवा आरोपी पोलिसांनी तपासात वाढवला आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कामठेवाड (Police Inspector Kamthewad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खज्जे (Assistant Police Inspector Khajje) हे करत आहेत. पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चार घंट्यापूर्वी कट शिजला!
विशाल आर्वीकर याच्यावर हल्ला करण्यापूर्वी आरोपीनी एकत्र येऊन हल्ला कुठे करायचा याचा कट शिजला. ही बैठक चार घंट्यापूर्वीच झाली होती. तेव्हापासून विशालच्या मार्गावर एक व्यक्ती ठेवण्यात आला होता. विशालचा पाठलाग करणार्या व्यक्तीने विशाल बाळासाहेब ठाकरे कमानीजवळ उभा असल्याची टीप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर विशाल वर हल्ला करण्यात आला. या कटात आणखी काही आरोपी असणार आहेत.