स्थानिक गुन्हा शाखेची परभणीतील पेडगाव परिसरात कारवाई
परभणी (Parbhani police) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पेडगाव येथे विनानंबरच्या बोलेरो गाडीवर टाकलेल्या छाप्यात ८ लाख ३२ हजार ६४० रुपयांचा अवैध गुटखा मुद्देमालासह जप्त करत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
पोलीसांच्या छाप्यात तब्बल ८ लाखाच्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त
परभणी पोलीस दलातर्फे (Parbhani police) ग्रामीण भागातील अवैध धंद्यावर कारवाई करताना शनिवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता पेडगाव येथे विनानंबरची बोलेरो वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री करण्यासाठी आणलेला आढळून आला. आरोपीने हे वाहन त्याच्या घरासमोर लावलेले असताना पोलीसांनी कारवाई केली. त्या बोलेरो गाडीत २ लाख ६६ हजार रुपयाची राजनिवास सुगंधीत पान मसाला, ६६ हजार ५२८ रुपयांचा जाफराबादी जर्दासह महिंद्रा कंपनीची विनानंबरची बोलेरो जप्त केली. सदरील कारवाईत रेणुकादास आकोलकर वय २८ वर्ष रा.पेडगाव या आरोपीस (Parbhani police) पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
एक आरोपी ताब्यात, जिल्ह्यातील मुख्यकेंद्र बिंदू कोण?
त्याच्या सांगण्यावरून तो माल त्याचा भागीदार जगन्नाथ टेकाळे याचा असल्याचे सांगीतले. तर संदीप शेठ, रा. रावराजूर जि.जालना येथून विकत आणत झरी येथे विकास देशमुख, पेडगाव येथे रमा गायकवाड, परभणी येथील आझम चौकातील समीर शेख यांना पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगीतले. त्यामुळे वरिल सर्व आरोपींविरुध्द परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई (Parbhani police) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे पोनि अशोक घोरबांड, सपोनि राजु मुत्येपोड, रवि जाधव, शेख रुफीयाददिन, सातपुते, निलपत्रेवार, गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास पोउपनि चंंदनसिंह परिहार हे करत आहेत.