परभणी/जिंतूर (Parbhani) :- घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिणे (Gold jewelry) मिळून ७ लाख २० हजार ९८५ रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना २७ मार्च रोजी रात्री पावने बाराच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे घडली. या प्रकरणी २९ मार्चला चार जणांवर जिंतूर पोलीसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील घटना चार जणांवर गुन्हा दाखल..
विठ्ठल ज्ञानदेव जगताप यांनी तक्रार दिली आहे, आरोपी किशोर नायबराव जगताप आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील रोख ३ लाख ४५ हजार रूपये आणि सोन्याची दोन तोळ्याची गोफ, सोन्याचे गंठण असे एकूण ३ लाख ७५ हजार ९८५ रूपये किंमतीचे दागिणे असा एकंदरीत ७ लाख २० हजार ९८५ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जिंतूर पोलीसात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि.मेहत्रे करत आहेत.



 
		

