पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली प्रस्तावाला मंजुरी
परभणी (Parbhani Robbery case) : संपूर्ण जिल्ह्याला हादरुन टाकणार्या पारवा अत्याचार, दरोडा प्रकरणात दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सदर (Parbhani Robbery case) प्रकरणात पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर पाच जणांचा शोध सुरू आहे.
परभणी तालुक्यातील (Parbhani Robbery case) पारवा शिवारात २ जानेवारीच्या मध्यरात्री शेत आखाड्यावर दरोडा टाकत एका महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला. महिलेचा पती, सासुला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत गुन्ह्यातील सराईत आरोपींना ताब्यात घेतले. तपासा दरम्यान सदर आरोपींवर यापूर्वी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली.
संबंधित आरोपींवर कारवाई (Parbhani Robbery case) करण्यासाठी मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आला. सदरचा प्रस्ताव पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील, परभणी ग्रामीणचे पोनि. श्रीकां डोंगरे, सपोनि. विक्रम हराळे, पो शी हाके,साईप्रकाश चन्ना, मधुकर चट्टे, भुजबळ, गणेश कौटकर, आगळे यांच्या पथकाने केली. (Parbhani Robbery case) प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख करत आहेत.