ध्वजारोहन करुन पदयात्रेस प्रारंभ
परभणी (Sadbhavana Rally) : रविवार सकाळी ९ वाजता काँग्रेसची सदभावना पदयात्रा रॅलीस परभणीतील पोखर्णी येथून ध्वजारोहन करुन पदयात्रेस सुरुवात झाली. एकता आणि बंधुत्वाचा संदेश देत जनतेची मने जोडण्यासाठी काँग्रेस पक्षांनी परभणीत सदभावना पदयात्रा आणि संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसारच (Sadbhavana Rally) सदभावना पदयात्रा व संविधान बचाव रॅली ही रविवारी सकाळी पोखर्णी येथून पदयात्रेमार्फत निघाली आहे. पहिल्या टप्यात परभणी तालुक्यातील सिंगणापुर फाटा येथे पदयात्रा थांबणार आहे.
रोकडोबा मंदिर येथे विश्रांतीची व्यवस्था व दुसर्या टप्यातील पदयात्रा (Sadbhavana Rally) परभणीतील तरोडा येथील सुरु होऊन परभणीतील गंगाखेड रोडवरील माहेर मंगल कार्यालय येथे संपणार आहे. सर्व पदयात्रे करुंचा मुक्काम परभणीतच असणार असून सोमवारी सकाळी ८ वाजता सदरील पदयात्रा परभणी जिल्हा काँग्रेस कार्यालय शनिवार बाजार येथून ते शिवाजी चौक मार्गे ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे अक्षदा मंगल कार्यालयात पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता परभणी शहरातील दुपारी १२ वाजता सदभावना संविधान बचाव सभा होऊन यात्रेचा समारोप होणार आहे.
सदरील पदयात्रेस (Sadbhavana Rally) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सतिश पाटील, कुणाल चौधरी, आ. नितीन राऊत, खा. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, मा.आ. सुरेश वरपुडकर, मा.मंत्री रमय्या बागवे, मा.खा. तुकाराम रेंगे पाटील, मा.आ. मोहन जोशी, एकनाथ मोरे, बाळासाहेब देशमुख, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, रामभाऊ घाडगे, केदार पाटील, भगवान वाघमारे, बाळासाहेब आकात, इरफानुर रहेमान, डॉ. जफर अहेमद खान, मा.आ. सुरेश देशमुख, भगवान वाघमारे, अॅड. मुजाहेद खान, नदीम इनामदार, आर.एस. देशमुख, धिरज कदम, यशपाल भिंगे यांची उपस्थिती होती. सदरील पदयात्रेचा दुसरा टप्पा सुरु असून उद्या संविधान बचाव सभा घेऊन यात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती मिळाली आहे.