जिंतूर ते औंढा रस्त्यावरील घटना
रस्त्याशेजारील पिंपळाच्या झाडाला धडकला ट्रक…!
परभणी (Parbhani Truck Accident) : जिंतूर येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाला मालवाहू ट्रक धडकल्याने ट्रक चालक, क्लिनर या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार १५ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास जिंतूर ते औंढा रस्त्या वरील पुंगळा पाटीजवळ घडली.या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेश कडून ए.टी. १६ टि.जे. ६३१८ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक येत होता. पुंगळा पाटीवर आल्यानंतर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले.
ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाला जावून धडकला. यामध्ये (Parbhani Truck Accident) ट्रकची कॅबीन पूर्णपणे उध्दवस्त झाली. ट्रकचा चालक, क्लिनर वाहनामध्ये अडकले. जेसीबी मशीन, क्रेनच्या मदतीने सकाळी दहाच्या सुमारास दोघांनाही बाहेर काढण्यात आले. संबंधितांना रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. महामार्ग पोलीस, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी बचाव कार्य राबविण्यात आले. (Parbhani Truck Accident) अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघातात ट्रक चालक अशोक दावलाजी कांबळे वय ५३ वर्ष, रा. नरंगल बु., ता. देगलूर जि. नांदेड हे मयत झाले आहेत. तर क्लिनर याचे नाव समजू शकले नाही. मृतदेहावर डॉ. मोरे यांनी शवविच्छेदन केले.