परभणी (Parbhani):- दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरुप आणि गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मात्र लोकसंख्या आणि गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांची (Police)संख्या वाढत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखत दैनंदिन कामकाज करताना पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत आहे. पोलीस ठाण्यांच्या स्थापनेपासून असलेली कर्मचारी संख्या आजतागायत कायम आहे. पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही.
आजची परिस्थिती पाहता या ठाण्याला ८० कर्मचार्यांची आवश्यकता
परभणी शहरात कोतवाली, नानलपेठ, नवा मोंढा हे तीन पोलीस स्टेशन आहेत. ग्रामीण भागासाठी परभणी ग्रामीण पोलीस ठाणे आहे. सदर पोलीस ठाण्यांच्या स्थापनेपासून कर्मचारी संख्येत बदल झालेला नाही. कोतवली पोलीस ठाण्यात ४७ पोलीस अंमलदार, ६ अधिकारी कार्यरत आहेत. आजची परिस्थिती पाहता या ठाण्याला ८० कर्मचार्यांची(employees) आवश्यकता आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात १९५ अंमलदारांची संख्या मंजुर आहे. सद्यस्थितीत अधिकारी, कर्मचारी मिळून ९२ जण कार्यरत आहेत. नवा मोंढा पोलीस ठाण्यात १२१ अंमलदार, १० अधिकारी मंजूर आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी ६९ अंमलदार आहेत. ग्रामीण पोलीस स्टेशनचा(Police Station) व्याप मोठा असून या पोलीस ठाण्या अंतर्गत ६० गावे येतात. या गावांसाठी ३६ पोलीस अंमलदार आणि ४ अधिकारी आहेत.
कामाच्या वाढलेल्या ताणामुळे कर्मचार्यांच्या आरोग्यावर परिणाम
उपलब्ध असलेल्या अधिकारी, अंमलदारांमधून काहीजण पोलीस ठाणे अंमलदार, सीसीटिएनएस, वायरलेस, कोर्ट कर्मचारी, बारनिशी, मुद्देमाल मोहरील, क्राईम मोहरील, हजेरी मेजर, वाचक, गोपनीय शाखा, वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत. तर दररोज काही कर्मचार्यांची साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा असते. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. सभा, मोर्चे, आंदोलन, सण उत्सव, जयंती, पुण्यतिथी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी लावण्यात आलेला बंदोबस्त देखील कर्मचार्यांना करावा लागतो. कामाच्या वाढलेल्या ताणामुळे कर्मचार्यांच्या मानसिक(Mentally), शारीरिक (physically)आरोग्यावर परिणाम होत आहेत.
१४१ पदासाठी भरती प्रक्रिया
जिल्हा पोलीस दलातील पोलीस चालक आणि शिपाई अशा दोन्ही पदांच्या मिळून १४१ जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी शारीरिक चाचणी प्रक्रिया पार पडली आहे. चालकांची वाहन चालविण्याची चाचणी देखील झाली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शुक्रवार १९ जुलै रोजी आयोजीत करण्यात आली आहे. या भरती नंतर काही नवीन उमेदवार पोलीस दलात रुजू होतील. परभणी शहरात कोतवाली, नानलपेठ, नवा मोंढा अशी तीन प्रमुख पोलीस स्टेशन आहेत. ग्रामीण भागासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत आहे.
नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव थंडबस्त्यात
परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात नवीन पोलीस ठाणे बनविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. शहराचा वाढता व्याप पाहता नवीन पोलीस ठाण्याची आवश्यकता होती सद्यस्थितीत हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेल्याचे दिसत आहे.