पिडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर सोनपेठ पोलीसात गुन्हा दाखल…!
परभणी/सोनपेठ (Parbhani Woman Abuse) : तुझ्या सोबत लग्न करणार आहे. मी तुझा होणारा नवरा आहे, असे म्हणत २६ वर्षीय तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना नव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान घडली. (Parbhani Woman Abuse) सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून २९ मार्चला सोनपेठ पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
पिडित तरूणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी विठ्ठल लिंबाजी जाधव याने सदर तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरूध्द संबंध ठेवले. फिर्यादीच्या घरी तसेच लातूर येथे नेत अत्याचार केला. (Parbhani Woman Abuse) पिडितेने आरोपीला लग्नाविषयी विचारणी केली असता संबंधिताने नकार देऊन तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली. आरोपीवर सोनपेठ पोलीसात गुन्हा दाखल (Parbhani Woman Abuse) करण्यात आला आहे. तपास पोउपनि. म्हात्रे करत आहेत.