परभणी (Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील मानधानी येथील तरुण शेतकरी आपल्या दैनंदिन कामासाठी आवराआवर करत असताना घराच्या पत्रात उतरलेल्या विज प्रवाहाचा धक्का बसल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून तरुण शेतकऱ्याचा (Farmer)अपघाती निधन (Death) झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मानधानी येथील घटना..!
याबाबत मिळालेली माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील मानधानी येथील शेतकरी कृष्णा तातेराव जाधव वय 27 वर्ष हे आपल्या घरी सकाळच्या सुमारास कामाला जाण्यासाठी आवराआवर करत होते यावेळी घराच्या पत्र्यात विजप्रवाह उतरला होते हे त्यांच्या लक्षात आले नाही अन् त्यांचा पत्राला धक्का लागला. यावेळी त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला यात ते जमिनीवर कोसळले घटना शेजारी व नातेवाईकांना समजताच त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनेची नोंद जिंतूर पोलिसात करण्यात आली आहे. मृतकाच्या पश्चात दोन बहिणी,पत्नी,एक महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याचा मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.