Parbhani:- माजी जीप सदस्य वाव्हळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय मध्येच केला आत्मदाहनाचा प्रयत्न (Attempts at self-immolation) पोलिसांनी मध्यस्थी करून पेट्रोलची बॉटल (bottle of petrol) हिसकावली लेखी आश्वासनाशिवाय कार्यालय सोडणार नाही असा हट्ट धरल्यानंतर अधिकाऱ्याची धावपळ सुरू.
पत्राचे उत्तर न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला मुलासह आत्मदहनाचा केला प्रयत्न
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानोबा वाव्हळे यांनी विकास कामना निधीसाठी वारंवार पत्र व्यवहार केला. मात्र पालकमंत्र्याकडून व जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांचे पत्राचे उत्तर न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला मुलासह आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी पेट्रोलची बॉटल जप्त करत जिल्हाधिकारींची संवाद साधत मध्यस्थी करून लेखी आश्वासन दिल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नसल्याचे ज्ञानोबा वावळे
यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र पोलीस आणि प्रशासन दोघांच्या मदतीने ज्ञानोबा यांना कार्यालयात बसून ठेवले आहे व शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी हे लेखी पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.