दुर्घटनेत ऑटो रिक्षा सह तीन दुचाकी चपट्या!
लातूर (Golai Lodge collapsed) : लातूर शहरात गंजगोलाई परिसरात दक्षिण बाजूला असलेल्या घंटीलाच्या इमारतीचा दक्षिणेकडील भाग शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास अचानक कोसळला. या (Golai Lodge collapsed) दुर्घटनेत एका ऑटोरिक्षासह तीन दुचाकी वाहनांचा अक्षरशा चेंदामेंदा झाला असून ही वाहने चपटी झाली आहेत. या दुर्घटनेमुळे लातूर शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुर्घटनेमुळे जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
लातूर शहरातील नेहमी गजबजलेल्या गंजगोलाई परिसरात सतत वाहनांचीही वर्दळ असते. गंजगोलाईच्या दक्षिण बाजूला घंटे लॉजची जुनी इमारत आहे. या जीर्ण इमारतीचा दक्षिणेकडील भाग शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. विशेष म्हणजे या (Golai Lodge collapsed) इमारतीच्या सावलीला, या भागात खरेदीसाठी आलेले अनेक बाजार करू नागरिक नेहमी थांबतात. सुदैवाने दुर्घटने वेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान या दुर्घटनेत इमारतीच्या नजीक थांबलेल्या ऑटो रिक्षा तसेच इतर तीन दुचाकी मात्र इमारतीच्या मलब्याखाली दबल्याने अक्षरशा चेंदामेंदा झाल्या.
लातूर महानगरपालिकेच्या सी झोनमध्ये घंटे लॉजची इमारत येते. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर जीर्ण इमारतींचा प्रश्न उद्भवल्यावर या इमारतीलाही पाडण्यासाठी नोटिसा दिल्या गेल्या असा दावा या (Golai Lodge collapsed) दुर्घटनेनंतर महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र नोटिसा दिल्यानंतरही ही जीर्ण इमारत का पडली नाही, हे एक कोडेच आहे.
दरम्यान महापालिकेच्या या झोनचे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी या (Golai Lodge collapsed) दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घंटे लॉज इमारतीत 22 दुकानदार असून या दुकानदारांना नोटीसा देऊन उद्या किंवा परवा या इमारतीच्या वरचा मजला पाडकाम करण्यात येईल असे सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जीर्ण इमारतींचा आकडा शंभरावर…
लातूर शहरात जीर्ण इमारतींची संख्या शेकड्याच्या घरात असल्याची चर्चा घंटे लॉजचा (Golai Lodge collapsed) काही भाग कोसळल्यानंतर शहरात सुरू झाली. शहराच्या विशेषतः जुन्या शहराच्या गाव भागात अशा इमारतींची संख्या अधिक असून महापालिका या इमारतींना केवळ नोटीसा देऊन का थांबते असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अशा दुर्घटना घडल्या व त्यात मोठी हानी झाल्यानंतर, जबाबदार कोण? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.