हिंगोली (Plastic Awareness Campaign) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मा. श्रीमती पंकजाताई मुंढे,मंत्री पर्यावरण यांच्या निर्देशनुसार दिनांक 22 मे 2025 ते 5 जून 2025 दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाचे महत्त्व’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने 22 मे रोजी मोहिमेची सुरुवात सेनगांव नगरपंचायत (Sengaon Nagar Panchayat) मार्फत मुख्य चौकात वापरलेल्या प्लास्टिक बॉटल (Plastic Bottle) इतरत्र कुठेही फेकू नये म्हणून बॉटलच्या आकाराची बॉटल संकलन पेटी उपलब्ध करून देण्यात आली. सर्व नागरिकांना प्लास्टिक बॉटल इतरत्र न फेकता सदर पेटीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्लास्टिक प्रदूषणाने (Plastic Pollution) होणारे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी सेनगांव नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री. गणेश द. गांजरे, लेखापाल श्री. बोकारे, कर निरीक्षक मस्के, स्वच्छ्ता निरीक्षक श्री पडोळे, प्रविण देशमुख, जारे, शहर समन्वयक श्री पवन, मुकादम कांबळे, डोके, गाढवे इत्यादी उपस्थित होते.