पांढरकवडा (Yawatmal) :- खेळात राजकारण नको, राजकीय मंडळी खेळाच्या संघटनेत नको असे आधी म्हटल्या जायचे, मात्र सद्याच्या परिस्थित खेळ संघटनेचे पदाधिकारीच राजकीय नेत्यांपेक्षा खेळात जास्त प्रमाणात राजकारण करीत आहे. खेळातील व संघटनेतील राजकारणात आज विदर्भातील कबड्डी व कबड्डी खेळाडुंची माती होत आहे. संघटनेवर प्रभाव असलेल्यांच्या ’’ठाकुर’’की मुळे आज विदर्भातील कबड्डी (Kabaddi) लयास गेली आहे. कधी काळी देश गाजविणार्या विदर्भाच्या संघात आज बाहेरील राज्यातील खेळाडु खेळविण्यात येत आहे.
देश गाजविणार्या विदर्भाच्या संघात आज बाहेरील राज्यातील खेळाडु खेळविण्यात येत आहे
उत्कृष्ट खेळाडु एैवजी ’’लक्ष्मी’’दर्शन घडविणार्यास संघामध्ये जागा मिळत आहे. त्यातील अनेक खेळाडु हे परराज्यातील असतात हे विशेष. विदर्भामध्ये आज विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या नावावर तिन संघटना कार्यरत आहे. यंदा दोन संघटनेच्या वतीने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी तर एका संघटनेच्या वतीने राष्ट्रीय कबड्डी (National) स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. विदर्भात आमचीच संघटना अधिकृत आहे, असे म्हणविणार्या संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी राज्य अजिक्यपद स्पर्धा घेण्यात येत आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासुन त्याचे प्रमाणपत्र खेळाडुंना देण्यात आलेले नाही. त्याआधी ज्या खेळाडुंना प्रमाणपत्र मिळाले त्यातील किती खेळाडुंचे व्हेरीफिकेशन झाले? याचे उत्तर कबड्डीमध्ये ’’ठाकुर’’ की गाजविणार्यांनी देण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. कबड्डीत कॅरीअर बनवु पाहणार्या आज शालेय विद्यार्थ्यांना कबड्डीचे प्रमाणात मिळत नाही. ज्यांच्याकडे आहे, अशांना १० वि १२ विच्या निकालात त्याचे गुण मिळालेले नाही. त्यामुळे आम्हीच अधिकृत आहो असे ’’डफरे’’ वाजविणार्यास आता खेळाडु व त्यांच्या पालकांनीच उत्तर मागण्याची हि खरी वेळ आहे.
कबड्डी मध्ये जास्त तर ग्रामीण व गरीब परिवारातील मुला-मुलींचा सहभाग आहे
कबड्डी मध्ये जास्त तर ग्रामीण व गरीब परिवारातील मुला-मुलींचा सहभाग आहे. अशांना वेठीस धरण्याचे काम गेल्या काही वर्षापासुन विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु आहे. कबड्डी संघटनेचा वाद सद्या सुप्रिम कोर्टा पर्यत गेलेला आहे. कबड्डीतील मक्तेदारी व भ्रष्टाचार रोखण्याकरीता काही राष्ट्रीय खेळाडुंनी (National sportsperson)पुढाकार घेवुन पदाधिकार्यांना चक्क न्यायालयात उभे केले आहे. त्यांचा न्यायालयात हा लढा सुरु असतांनाच इकडे विदर्भामध्ये त्या जिल्ह्यातील मंडळावर बंदी, त्या खेळाडुंवर बंदी असे संघटनेतील काही तथाकथीत पदाधिकारी ‘‘डफरे’’ वाजवित फिरत आहे. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडुंचे खच्चीकरण होत आहे. संघटनेच्या पदाधिकार्यांच्या म्हणण्यानुसार पैसे (फी) भरली नाही तर तुमच्या स्पर्धा कशा होतात, अशी धमकी देवुन हे कबड्डीचे मक्तेदार आयोजकांच्या स्पर्धा फेल करण्याकरीता येडी चोटीचा जोर लावत आहे.