परभणी/पाथरी (Parbhani):- शहरा शेजारील पुरा भागात असणाऱ्या साईनगर जि .प. शाळेच्या मैदानाला मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने तळ्याचे स्वरूप आले असून वर्गखोल्यात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेच्या पाठीमागील खाणीमध्ये पाणी ओव्हरफ्लो होत मैदानात आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
पाणी ओव्हरफ्लो होत मैदानात आल्याने ही परिस्थिती उद्भवली
पाथरी शहराशेजारील पुरा भागात साईनगर येथे जिल्हा परिषदेचे ची इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे. या ठिकाणी ४० विद्यार्थी शिक्षण घेतात. राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब च्या शेजारी सखल भागामध्ये एका बंद खाणीच्या शेजारी ही शाळा (School)उभारण्यात आलेली आहे . मागील चार दिवसापासून जोरदार पडत असलेल्या पावसाने परिसरातून आलेले पाणी खाणीमधुन शाळेच्या मैदानापर्यंत आले आहे. आधीच खाणीमध्ये सांडपाणी वाहून आलेले पाणी दुर्गंधीयुक्त (smelly) असुन हेच पाणी शाळेच्या मैदानावर साठल्या गेले असून त्यामुळे पाण्यातून वर्गखोल्याकडे जाणारे विद्यार्थी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील चार दिवसापासून पाणी कमी होण्याचे नाव घेत नसून विद्यार्थ्यांची प्रार्थना शाळेच्या व्हरांड्यात घ्यावी लागत आहे. वर्ग खोल्यात जाण्यासाठी शिक्षकांनी विटा टाकून तात्पुरता रस्ता करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे.