धामणी ग्राम पंचायत मधील प्रकार
आ. डहाके व बिडियो यांना निवेदन
मानोरा (Dhamani Gram Panchayat) : मानोरा पंचायत समिती कार्यालयाच्या हाकेवर असणाऱ्या ग्राम पंचायत धामणी (Dhamani Gram Panchayat) गावात गरीब कुटुंब लाभार्थी घरकुलापासून वंचित तर श्रीमंत लोकांनाच घरकुलाचा जास्त लाभ मिळाला आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा १ जुलै पासून पंचायत समिती आवारात आमरण उपोषण करणार असल्याचे इशाऱ्याचे निवेदन आमदार सईताई डहाके व बिडियो यांना मित्तल शंकरराव धोटे यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, ग्राम पंचायत धामणी ( मानोरा ) गावात एकूण २९० घरकुल मंजूर असुन सर्वांचे ऑनलाईन नोंदणी झालेली नाही आहे. परंतु अद्यापपर्यंत जवळपास ७५ ते ८० लाभार्थ्यांना लाभ मिळाला असुन बाकी जाणीवपूर्वक हेतुपुरस्परपणे वंचित ठेवल्या जात आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्यामधील काही लाभार्थ्यांचे २ ते ३ चेक देऊन बाकीचे जाणीवपूर्वक थांबविले आहे.
गरीब लाभार्थीचे फाईल थांबवून श्रीमंत व पक्के घर असलेल्या लोकांना घरकुलाचे लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळे (Dhamani Gram Panchayat) सदरील प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करणार असा इशारा धोटे यांनी दिला आहे.