Wardha :- जगाला स्वछतेचा संदेश देणार्या गांधी-विनोबांच्या जिल्ह्यात सध्या स्वच्छतेचे तीने तेरा वाजले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागासह मार्केट लाईनमधील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणत कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येते.
सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन
शहरातील बाजारपेठेत मागील दहा दिवसांपासून स्वच्छताच झालेली नाही. शनिवारी बहिण-भावाच्या प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन (Rakshabandhan)उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. रक्षाबंधनानिमित्त मार्वेâट परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीकरीता गर्दी पाहायला मिळाली. मात्र रक्षाबंधन उत्सव जरी थाटात साजरा झाला तरी मार्वेâटमध्ये कचर्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दुसर्या दिवशीही दिसून आले. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या भागात काम करणार्या कर्मचार्यांना कित्येक महिन्यापासून वेतन नसल्यामुळे काम बंद करण्याचे हत्यार उपसले आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेत सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य झालेले आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमाने स्वच्छता राबविली जाते. सध्या नगर परिषदेमध्ये स्वच्छता विभागामध्ये काम करणार्या कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने इतर कर्मचार्यांवर संपूर्ण शहराची स्वच्छता करण्यासाठी ताण येतो. यावर तोडगा काढून बाजारपेठेच्या परिसरात असणार्या चार वॉर्डासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणार्या स्वच्छता ३० कर्मचार्यांना नेमल्या गेले होते. त्यासाठी एका कंत्राटदाराला काम सुद्धा दिले होते.
कंत्राटदाराने कामावरील कर्मचार्यांना वेतन न दिल्यामुळे स्वच्छता कर्मचार्यांनी काम करण्यास नकार दिला
परंतु या कंत्राटदाराची देय रक्कम न दिल्याने पर्यायाने कंत्राटदाराने कामावरील कर्मचार्यांना वेतन न दिल्यामुळे स्वच्छता कर्मचार्यांनी काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसापासून परिसरात साफसफाई झाली नाही. महादेवपुरा, बाजारओळ, सराफ लाईन, कपडा लाईन, धान्य बाजार ओळ आणि मुख्य रस्त्यावर सफाई झाली नाही. वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी शहरात राहणार्या नागरिकांना खरेदी करण्याकरिता या बाजारपेठे शिवाय दुसरा पर्याय नाही. या बाजारपेठेमध्ये मोठी दुकाने आहेत. लाखो रुपयांचा व्यवसाय याच बाजारपेठेमध्ये दररोज होत असतो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. ग्राहक आणि वस्तू खरेदी केल्यानंतर अनेक दुकानातून दिवसभरातून कचरा बाहेर येतो. पर्यायाने तो कचरा दुकानाच्या बाहेर फेकला जातो. बाजारपेठेत दररोज जिल्ह्यातून अनेक ग्राहक(Costumer) खरेदीसाठी शहरात येत असतात. अस्वच्छतेचा कळस शहरात सध्या दिसून येत असल्याने या ठिकाणची साफसफाई होत नाही का असे प्रश्न त्यांनी दुकानदारांनाच विचारले. त्यामुळे नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक बाबींचा विचार शेवटी नगरपरिषदेलाच करायचा आहे. कुठल्या कामाला पहिले प्राधान्य द्यावे याबाबत मात्र नियोजनाचा अभाव नगरपरिषदेमध्ये दिसून येत आहे.