पाथरी शहरातील परिस्थिती!
परभणी (Power Supply) : परभणीच्या पाथरी शहरातील सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरीकांच्या (Citizens) वतीने माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी (बाबाजानी) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (Maharashtra State Electricity Distribution Company) अधीक्षक अभियंता परभणी यांना निवेदन देण्यात आले.
16 जून पासून उपोषणाचा इशारा!
पाथरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याविषयी दिलेल्या निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत निषेध (Prohibition) नोंदविण्यात आला आहे. शहरातील जुनाट व जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या, ओव्हरलोड रोहित्रे आणि वेळेवर काम न झाल्यामुळे अनेक भागात नियमित वीज पुरवठा (Power Supply) होत नसल्याची तक्रार करण्यात आली.
हजारो नागरिकांसह उपोषण करण्यात येईल, असा इशारा!
निवेदनात विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली विविध वीज सुधारणा कामे जसे की नवीन रोहित्रांची बसवणी, जीर्ण वाहिन्यांचे नूतनीकरण, केबल व बॉक्स बदलणे अद्याप सुरु न झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रश्नांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर 16 जून पासून कार्यालयासमोर हजारो नागरिकांसह उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
वीज व्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी!
निवेदन देताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत संतोष देशमुख, दत्तराव मायंदळे, मलिक पटेल, मिलिंद आठवे, रिंकू पाटील, लक्ष्मण पाठक, दादाराव गवारे आणि इतर पदाधिकारी (Official) उपस्थित होते. निवेदन कार्यकारी अभियंता जी. के. गडेकर यांना सादर करण्यात आले. या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वीज व्यवस्था (Power System) सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.