बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा ; सरकारच्या भूमिकेचा विरोधात नाराजी!
परभणी (Prahar Aandolan) : दिव्यांग व शेतकर्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेचे बच्चु कडू यांनी अन्नत्याग आंदोलन (Food Abstinence Movement) सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारच्या धोरणांचा निषेध करत गुरुवार 12 जून रोजी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आंदोलन मैदान येथे प्रहार संघटनेच्या पदाधिकार्यांनी (Officers) हलगी वाजवत मुंडण आंदोलन केले.
आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष!
दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्यांना (Farmers) संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पिकाला हमी भावावर वीस टक्के अनुदान द्यावे, युवकांच्या हाताला काम द्यावे, घरकुलासाठी 5 लाखाचे अनुदान द्यावे, स्वतंत्र मंडळ स्थापन करावे, खतांना अनुदान द्यावे, मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे, दुधाचे दर वाढवावे, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी 8 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाचा (Government) निषेध करत परभणीत प्रहार संघटनेतफ्रे आंदोलन करण्यात आले.




 
			 
		

