भाईजींनी केले स्वागत व झाल्या राजकीय चर्चा!
बुलडाणा (Prakash Ambedkar) : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आरक्षण बचाव रॅलीसाठी बुलढाण्यात आले असता, त्यांनी आज मंगळवार ६ ऑगस्ट रोजी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांच्या चिखली रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ॲड. प्रकाश आंबेडकर हे भाईंजींच्या निवासस्थानी जाताच त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बुलढाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर व सहकार विद्या मंदिराच्या अध्यक्ष सौ. कोमलताई झंवर प्रामुख्याने उपस्थित होत्या. (Prakash Ambedkar) ॲड. प्रकाश आंबेडकर व राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी यावेळी महाराष्ट्रात एकूणच राजकीय परिस्थिती बाबत चर्चा केल्या.