दोषी पोलिस अधिकार्यांवर कारवाईची मागणी
अकोला (Prasanna Wankhade Suicide Case) : शहरातील आकाशवाणी परिसरातील जलाराम सोसायटीत राहणार्या प्रसन्न वानखडे (Prasanna Wankhade Suicide Case) याने आपसातील वाद व सिव्हिल लाइन पोलिसांच्या जाचापायी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात दोषी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. या प्रकरणाची थेट तक्रार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही भाजपाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे प्रकरणाची करणार तक्रार
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी असलेला विद्यार्थी प्रसन्न वानखडे (Prasanna Wankhade Suicide Case) हा सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील आकाशवाणी परिसरातील जलाराम सोसायटीमध्ये राहत होता. त्याचे अकोल्यात शिक्षण सुरू होते. त्याचे आपसी वाद होते तर सिव्हिल लाइन पोलिसांनी त्याचा प्रचंड छळ केल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेला जेही दोषी पोलिस अधिकारी असतील त्यांच्यावर पोलिस विभागाने कारवाई करावी, अन्यथा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर गंभीर प्रकरणाची तक्रार करणार असल्याचेही भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसन्न वानखडे (Prasanna Wankhade Suicide Case) हा विद्यार्थी प्रभाग क्रमांक पाचमधील जलाराम सोसायटी आकाशवाणीमागे राहत होता. एका आपसातील छोट्या वादामुळे तक्रारीवरून सिव्हिल लाइन स्टेशनच्या (civil line police) पोलिस अधिकार्यांनी त्रास दिल्यामुळे बारावीत शिकणार्या विद्यार्थ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी पोलिस अधिकार्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आत्महत्या प्रकरणाची पालकमंत्र्यांकडून दखल
प्रसन्न वानखडे (Prasanna Wankhade Suicide Case) या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनीसुद्धा दखल घेतली असून, दोषींबद्दल कडक कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहे.
दोषींवर कारवाई करा, आमदार सावरकरांची मागणी
अकोला प्रसन्न वानखडे (Prasanna Wankhade Suicide Case) विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी दोषी पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व यासंदर्भात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वानखडे परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.