गडचांदूर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
कोरपना (Educational institution) : नांदा येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, नांदा येथील अध्यक्ष सुनीता लोढीया यांना त्यांच्याच संस्थेतील सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत गडचांदूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. दरम्यान (Educational institution) संस्थेचे सचिव डॉ.अनिल मुसळे यांनी देखील तुम्ही माझे विरुद्ध अध्यक्ष पद रद करण्याकरिता केस टाकली आहे. ती वापस घ्या, नाहीतर तुम्ही चंद्रपूर वरून शाळेत कसे येता म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने दिल्याची तक्रार दाखल केली आहेत. यामुळे तालुक्यात शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. (Educational institution) संस्थेत गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे अनेक दिवसांपासून अध्यक्ष व सचिवांमध्ये वाद सुरू आहे. स्वातंत्र्यदिनी हा वाद आणखी चव्हाट्यावर आला. पाऊस लागल्याने व्यवस्थापन कार्यालयात बसण्याकरिता अध्यक्ष सुनीता लोडिया यांनी सचिव अनिल मुसळे यांना कार्यालयाची चावी मागितली असता ती चावी देण्यास मुसळे यांनी नकार दिला. शिवीगाळ करून निघून गेल्याचा आरोप सुनिता लोढीया यांनी केला आहे. तर माझ्यावर खोटा आरोप करून तक्रार दाखल केल्याचे मुसळे यांनी म्हटले आहेत. पुढील तपास गडचंदूर पोलीस करीत आहे.