दिग्रस (Check Dishonor Case) : धनादेश अनादर प्रकरणी दिग्रस येथील न्यायीक दंडाधिकारी नितीन ढोके (प्रथम श्रेणी) यांनी आरोपी चा गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. दिग्रस न्यायालयात २०१९ मध्ये फौजदारी प्रकरण फिर्यादी बालाजी अर्बन को. आफ संस्था दिग्रस यांनी प्रल्हाद भगवान भगत रा. हरसुल यांच्या विरुद्ध (Check Dishonor Case) धनादेश अनादरित झाल्याचे प्रकरण दाखल केले होते.
त्यामुळे न्यायालयाने (Check Dishonor Case) फिर्यादीची बाजू ऐकून घेऊन आरोपीस दोषी ठरवून मागिल २३ मे रोजी आदेश पारित करुन आदेशा पासून एक महिन्याच्या आत एक लाख ६० हजार रुपये रक्कम देण्यास आदेशित केले व ६ महिन्याची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादी ला संहिता कलम ३५७(३) रक्कम एक लाख ६० हजार रुपये देण्याचे नमूद केले आहे. रक्कम न दिल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल.