पुसद(Yawatmal):- विधानसभामतदार पुसद संघाची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर आली आहे. महाविकास आघाडी चे उमेदवार शरद मैंद हे तुतारी वजविणारा माणूस हे बोध चिन्ह घेऊन मतदारांसमोर जात आहेत. मात्र महायुतीचे उमेदवार इंद्रनिल नाईक यांच्यासाठी मतदान (Voting) मागणाऱ्या भाजप, शिवसेना नेत्या कार्यकर्त्याना कमळ किंवा धनुष्य बाण ऐवजी घड्याळासाठी मतदान मागत असल्यामुळे मतदार गोंधळात पडला आहे.
पुसद संघाची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वळणावर
पाच वर्षांपूर्वी एड. निलय नाईक भाजप चे उमेदवार होते. त्यावेळी घड्याळ चिन्हाचा उद्धार करणारे भाजप (BJP) शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आज घड्याळ साठी मत मागत असल्यामुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमात आहेत. कदाचित पुढील निवडणूकीत राजकीय परिस्थिती बदलून पुन्हा कमळ विरुद्ध घड्याळ अशी लढत झाल्यास मतदारांपुढे कोणत्या तोंडाने जाणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे. इकडे शिवसेनेची देखील घड्याळचा प्रचार करतांना कुचंबणा होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता प्रचारात सहभागी होत नसल्याचे दिसते.