Pusad :- येथील कै. शेषराव पाटील जिनींग च्या जमीन विक्री प्रकरणात संस्थेच्या ४२३५ सभासदांचे आर्थीक हित व कायदेशिर अधिकारावर गंभीर आघात करण्यात आल्याने संस्थेचे सभासद ज्ञानेश्वर तडसे, संजय ठाकरे आणि शंकरराव तोरकड यांनी अमरावती सहकार न्यायालयात (Courts) वाद प्रकरण कं.९६/२०२३ हे दाखल केले. त्यामध्ये अध्यक्ष कै. शेषराव पाटील जिनींग व प्रेसिंग सहकारी संस्था म. पुसद, प्रोप्रा. प्लॉस्टो टॅक्स अन्ड पाईपस् कं. प्रा.लि, नागपूर तसेच मे. कपीश फायनान्सिंयल भागीदारी संस्था म. नागपुर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
प्रकरण खारीज करण्याचा अर्ज जिनींग संस्थेने सर्वोच्च न्यायालयाचा केस संदर्भ देत दाखल केला
जिनींग संस्थेची जमीन बाजारभावापेक्षा कमी किमतीला विकणे, दहा लाखा पेक्षा अधिक किमतीची जमीन ई-निवीदे शिवाय विकणे, सभासदांचे आर्थीक हितावर आघात करणे या प्रमुख कायदेशिर मुद्यावर . प्रतिवादी क.१ व २ यांचे मधील तसेच प्रतिवादी कं.२ व ३ मधील खरेदीखत बेकायदेशिर घोषीत व्हावे अशी विनंती या प्रकरणात करण्यात आली आहे. मात्र अमरावती सहकार न्यायालयाला (Amravati Cooperative Court) नोंदणीकृत खरेदी खतसबंधी प्रकरण चालविण्याचा न्यायाधिकार नसल्याने प्रकरण खारीज करण्याचा अर्ज जिनींग संस्थेने सर्वोच्च न्यायालयाचा केस संदर्भ देत दाखल केला. मात्र हा अर्ज तसेच नागपूरच्या अपीलेट सहकार न्यायालयात रिव्हीजन पिटीशन ४/२०२५ हे प्रकरणही खारीज होऊन मुळ प्रकरण पुन्हा अमरावती कोर्टाकडे (Amravati Court) सुनावणी साठी परत पाठविण्यात आले. नागपूरच्या अपीलेट सहकार न्यायालयाच्या कामकाजात नागपूर उच्च न्यायालयातील एड.अंजना सुनिल नरवाडे यांनी तर अमरावती सहकार न्यायालयात एड. चंद्रशेखर शिंदे पुसद यांनी महत्वपुर्ण सहभाग घेतला.
अमरावती सहकार न्यायालयातील वाद प्रकरण कं. ९६/२०२३ मध्ये वादीपक्षाने सबळ लेखी पुरावा दाखल केला. सहकार क्षेत्रातील वाद प्रकरणे चालविण्याचा न्यायाधिकार सहकार न्यायालयाला असल्यामुळे संस्थेच्या एकुण ४२३५ सभासदांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे असे मत अॅड. चंद्रशेखर शिंद यांनी व्यक्त केली.