नवी दिल्ली (Rahul Gandhi) : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सभापती ओम बिर्ला (Speaker Om Birla) यांनी विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. आज जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये, लोकसभा सचिवालयाने अधिकृतपणे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि रायबरेलीचे खासदार, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना विरोधी पक्षनेते कायदा, 1977 च्या वेतन आणि भत्ते कलम 2 अंतर्गत विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यात आली आहे. लोकसभा (Speaker Om Birla) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या निर्णयाची माहिती लोकसभा सचिवालयाला दिली. त्यानंतर सचिवालयाने अधिसूचना जारी करून सभागृहाचा हा निर्णय सार्वजनिक केला.
To protect the Constitution is the duty of every patriotic Indian.
We will fulfill this duty in full measure. pic.twitter.com/8O1JA24cBa
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 25, 2024




